प्रिय विद्यार्थी तसेच सुजाण जागरूक पालकांच्या सेवेत महाराष्ट्र राज्यातील तमाम मराठी भाषिक मराठी माध्यमांत शिक्षण घेणाऱ्या इय्यता दहावी मराठी व सेमी माध्यमांच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यास मार्गदर्शनासाठी विद्यार्थी मित्र प्रा रफीक शेख सरांचा लेख संग्रह संपादित ' करा स्मार्ट अभ्यास आणि मिळवा यश हमखास ' या विद्यार्थी सेवा समर्पीत भावनेनें तयार करण्यात आलेल्या या मोफत ब्लॉग पोर्टल वर मनःपूर्वक हार्दिक स्वागत आणि आभार..!
Showing posts with label #SSC_Exam_Alert. Show all posts
Showing posts with label #SSC_Exam_Alert. Show all posts

Thursday, February 3, 2022

📣 राज्य शिक्षण मंडळाने 10 वी -12 वी परीक्षेसंदर्भात घेतले महत्वाचे निर्णय.

✒️ राज्यातील 10 वी 12 वीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार असे महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळाने आज स्पष्ट केले आहे

🗣️ तसेच 12 वी च्या परीक्षा 4 ते 30 मार्च , तर 10 वी 15 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत होणार - अशी माहिती राज्य शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी  दिली आहे 

🤷‍♂️ कसे असणार परीक्षेचे स्वरूप.. ?

🔰 जे विद्यार्थी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा देऊ शकले नाहीत - ते विद्यार्थी लेखी परीक्षेनंतर ही परीक्षा देऊ शकणार आहेत , ५ एप्रिल ते २२ एप्रिल या काळात या परीक्षा होणार आहेत..

🔰 विद्यार्थी ज्या शाळेत शिकतो त्याच शाळेत परीक्षा केंद्र असेल - १५ किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थी असेल तर त्या शाळेला उपक्रेंद मिळणार आहे..

🔰 लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे ४० ते ६० गुणांसाठी १५ मिनिटे अधिक वेळ - तर ७०-१०० गुणांच्या परीक्षेसाठी अर्धा तास जास्त वेळ देण्यात येणार.. 

🔰 सकाळच्या सत्रातील परीक्षा १०.३० वाजता सुरु होणार आहे ,तर विद्यार्थ्यांना १०.२० वाजता प्रश्नपत्रिका देण्यात येणार...

🔰 तर दुपारच्या सत्राची परीक्षा २.३० वाजता सुरु होईल आणि विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका २.२० वाजता देण्यात येणार आहे..

🔰 दरम्यान ७५ टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा असणार - याव्यतिरिक्त प्रात्यक्षिक परीक्षा शाळेतील शिक्षकच घेतील.


यंदा अशी होणार बोर्डाची परीक्षा...

बारावीच्या परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च २०२२ दरम्यान ऑफलाइन पद्धतीने होणार...

> १४ फेब्रुवारी ते ३ मार्च तोंडी परीक्षा तसेच प्रॅक्टीकल परीक्षा होतील.

> दहावीच्या लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२ दरम्यान ऑफलाइनच होतील.

> २५ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान दहावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा होतील.

> परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे महाविद्यालय किंवा शाळा हेच उपकेंद्र असेल अशी रचना करण्यात आलीय.

> एखाद्या शाळा किंवा महाविद्यालयामध्ये १५ पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर जवळचं महाविद्यालय केंद्र असणार आहे.

> करोना काळात ऑनलाईन वर्ग भरत असल्याने विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झालाय ही बाब लक्षात घेऊन वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

> ४० टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होणार.

> १० मिनीटं आधी प्रश्नपत्रिका देणार.

> ४० ते ६० गुणांसाठी १५ मिनिटांचा अधिकचा कालावधी देण्यात येणार आहे.

> ७० ते १०० गुणांची परीक्षा असल्यास अर्धा तासाचा अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे.

> दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हे नियम लागू असतील.

> करोनाच्या पार्श्वभूमीवर एका वर्गात जास्तीत जास्त २५ विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसवलं जाणार आहे.

> परीक्षेला विद्यार्थी झीक झॅक पद्धतीने सुरक्षित अंतर ठेऊन बसतील असे नियोजन करण्यात आले आहे.

> करोनामुळे परीक्षा देण्याची संधी हुकली तर ३१ मार्च ते १८ एप्रिलदरम्यान पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे.

> एक्सटर्नल एक्झामिनर म्हणजेच तोंडी परीक्षांसाठी बाह्य शिक्षक नसणार. एकाच विषयाचे दोन शिक्षक असतील तर तेच घेणार परीक्षा.

> एक्सटर्नल शिक्षक आला तर विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर परिणाम होतो. म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय.

> परीक्षांचे पर्यवेक्षक हे शाळा कॉलेजमधील असतील की बाहेरील हे लवकरच ठरवलं जाईल.

> अतिरिक्त प्रमाणामध्ये फिरती पथकं नेमण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शाळा, कॉलेजांमध्येच केंद्र असल्याने कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आलीय.

> परीक्षेसाठी लस बंधनकारक असणार नाही.

😇 10 वी -12 वी -  विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा..

🎓SSC-Activity -Sheets : For Practice

♦️ *SSC- Activity Sheet - March-2019* https://bit.ly/3Abk7nk ♦️ *SSC- Activity Sheet July -2019* https://bit.ly/3BXFycz ♦️ *SSC- Activity Sh...